👶 लहान बाळाला चांदीचे दागिने का घालतात?
👉🏻 *मुलांचा मानसिक विकास होतो :* चांदीचे दागिने घातल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही. लहान मुलाला चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्यांच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या आणि पैंजण घातले जातात.
👉🏻 *चांदीमुळे मुलांच्या अंगातली उर्जा बाहेर जात नाही :* ज्योतिषशास्त्रानुसार, लहान मुलांनी पायात पैंजण, गळ्यात माळ, हातात चांदीच्या बांगड्या घालणे अत्यंत चांगले मानले जाते. चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चांदी हा एक प्रतिक्रियाशील धातू आहे आणि चांदी शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करत असते.
👉🏻 *रोगांशी लढण्याची क्षमता :* चांदीला जंतूनाशक धातू मानले जाते. चांदीमुळे लहान मुलांची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते असे मानले जाते. लहान मुलांना चांदीचे दागिने घातल्याने जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात.